Friday, April 18, 2014

Birth Centenary of Shantaram Nagesh Shiroor 1914-2014 (Ramnavami)



Birth Centenary of Shantaram Nagesh Shiroor 1914-2014 (Ramnavami)
Revati:गेल्या महिन्यातला रामनवमीचा दिवस (८-०४-२०१४) आम्हा शिरूर परीवारांसाठी विशेष महत्वाचा होता कारण तो माझ्या सासर्यांच्या (पप्पा - शांताराम नागेश शिरूर) जन्माशाताब्दिपुर्तीचा दिवस होता. पप्पांचे वडील नागेश आणि आई अंबा ह्यांना सात अपत्ये ( तीन मुले आणि चार मुली). ह्या परिवारातील सुमारे ३० ते ३५ नातेवाईकांनी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला ग्रांट रोडच्या दहा तपांच्या वास्तूत अगत्याचे येणे केले होते. एका माहितीपटाद्वारे पप्पांचे शिरूर आणि बैन्दूर येथील बालपण व १९४५ च्या सुमारास मुंबईत ग्रांट रोड येथे वास्तव्यास आल्यानंतर साधे परंतु परोपकारासाठी झटलेले जीवन दाखवले गेले. पप्पांचे निवृत्तीपर्यंतचे जीवन पॉप्युलर बुक डेपोत पुस्तकांच्या सहवासांत गेले. शिरूर वंशवेलाची मोठी पोस्टर देखील या निमित्ताने लावली होती ज्या योगे दूरच्या आप्तेष्टांची सुद्धा सर्वांना माहिती व्हावी. पप्पांना गाणे ऐकण्याची भारी आवड. त्यांनी सर्वात प्रथम घेत्लेला ग्रामोफोन व शंभरच्या वर जमवलेल्या ७८ आरपीमच्या रेकॉर्ड्स, रेडीओ कॉमेंट्री ऐकण्या साठी घरी येणाऱ्या वाडीतील लोकांची गर्दी वगैरे आम्हा सर्वांना गत काळात घेउन गेली. त्यांना बैठ्या खेळाची फारच आवड विशेष करून ३०४ हा पत्त्यांचा खेळ, दाडफीड, पगडे, कॅरम इत्यादी. तीच आवड आम्हा मध्येही कायम असल्यामुळे ३०४ चा आठ जणांचा खेळ खेळला गेला तो इतका रंगला की ‘वक्ई,तुरूफ,कोट,दिवाळी’ वगैरे आरडा ओरड खाली रस्त्यापरंत पोचत होती. खेळातील रंगतदार लकबी, पान जोरात टाकून आपल्याकडील हुकुम सुचविणे, आरोप, प्रत्यारोप वगैरेंनी घर गजबजून गेले होते.एकंदरीत जन्माशाताब्दिपुर्तीचा सोहळा फारच रंगतदार झाला आणि कार्यक्रमाची सांगता थंडगार पानक पनवाराने झाली

-    रेवती वंदन शिरूर
-    ९३२२८८०७३७


























No comments:

Post a Comment